आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी नऊ वाजता गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे गणेश विसर्जना मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली विसर्जनाच्या वेळी नवीन पुलावरून जात असताना एका युवकाचा अचानक पाय घसरून तो थेट गोदावरी नदीपात्रात पडला क्षणभरात परिसरात एकच खळबळ व गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या पथकाने तत्परता दाखवत नदीत उडी घेतली त्यानंतर या युवकाला वाचवण्यात आले. त्यानंतर युवक आणि हात जोडून पोलिसांचे व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले