काँग्रेस कमिटी पाचोरा शहर अध्यक्ष काँग्रेस अॅड. अमजद पठाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध पत्रकार दिली आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष पद सांभाळत असतांना या कार्यकाळात बुथ कमेट्या, मंडळ कमेट्या, मोर्चे, तसेच सेल इत्यादी संघटनात्मक रचना गठीत कार्यान्वीत करण्याचे काम केले आहेत. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन केले.