लातूर -महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रभावित शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतपॅकेज जाहीर करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार असून, नदीकाठच्या शेतीसाठी ३.४७ लाख रुपयांचे विशेष पॅकेज, पीक विमाधारकांना १७ हजार रुपये, तसेच रब्बी पेरणीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत शासन देणार आहे.