राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NRHM) कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन तीव्र केले आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी या आंदोलनाला 17 दिवस पूर्ण झाले असून सतराव्या दिवशी सकाळी 10 वाजतापसून कर्मचाऱ्यांनी काळे कपडे परिधान करून शासनाच्या विरोधात जोरदार निषेध नोंदवला.या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये जानेवारी २०२४ पासून प्रलंबित असलेला पगार तात्काळ मिळावा, पगारवाढ, सेवेचे समायोजन, ‘समान काम, सम