आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्यासाठी ₹414.74 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. या पुढाकाराला मान्यता देत पुढील कार्यवाहीसाठी आज दि.13 सप्टेंबरला 12 वाजता आश्वस्त केल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे आ. मुनगंटीवार यांनी मनस्वी आभार मानले.