चमक सुरवाळा येथील चंद्रभागा नदीत आज दुपारी १:३० वाजता पाय घसरुन एक इसम वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानदीप पारीसे वय ४२ वर्ष रा. चमक असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर घातला असून नदी नाले भरभरून वाहत आहे, अशातच चमक सुरवाळा येथील चंद्रभागा नदीला पूर आल्याने आज नदी पार करताना ज्ञानदीप पारीसे या ४० ते ४२ वर्षाच्या इसमाचा पाय घसरला आणि इसम नदीत वाहून गेला.