धुळे शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीपूर्वी सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या उपस्थितीत झालेल्या या संचलनात २४ अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल व होमगार्डसह ३५० जवान सहभागी झाले. मुस्लिम बहुल भागातून काढलेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली.