गडंकी येथील अल्पवयीन मुलीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. राजराजेश्वर मंदिरापासून निघालेला मोर्चा जय हिंद चौक, गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. लाखो नागरिक, महिला, युवकांनी हातात निषेध फलक घेऊन “बलात्काऱ्याला फाशी द्या” अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, आरोपीला फाशीची मागणी केली. खासदार अनुप ध