चोपडा तालुक्यात आडावद हे गाव आहे. या गावातील रहिवाशी मंगलाबाई भिल वय ४० ही महिला तिच्या मुलीस घेण्याकरिता दगडी मनवेल या गावी आल्या होती. दरम्यान मुलीस नेण्याच्या कारणावरून त्यांचे जावई संदीप गायकवाड आणि त्यांचा भाऊ दीपक गायकवाड या दोघांनी या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेने दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे