भंडारा शहरातील बजरंग चौकात नवबजरंग गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मानाचा महागणपतीची स्थापना दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली होती. दरम्यान दिनांक 9 सप्टेंबर रोजी मानाचा महागणपतीची विसर्जनानिमित्त भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संपूर्ण भंडारा शहरात भ्रमण केल्यानंतर रात्री 8.30 वाजता दरम्यान गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी भंडारा शहरातील अनेक मान्यवर, गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच भंडारा शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.