पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस स्टेशन भाग्यनगर आणि पोलिस स्टेशन इतवारा या तीन पोलिस स्टेशन हद्दीत उपरोक्त कारवाई केली आहे. अशी माहिती आज सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.