कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असून, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज विविध पूरग्रस्त भागांची पाहणी केली.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुढील १८ तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी हळूहळू स्थिरावत असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.मात्र,संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी आवाहन केले आहे.