पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी शिवारात एका मेंढपाळ तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी, 52 वर्षे व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक केरा भीलाला असे मयत तरुणाची नाव आहे. याप्रकरणी विलास एकनाथ मोरे वय 52 वर्ष यांच्याविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी खून करून फरार झालेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे.