यावल तालुक्यात चिखली हे गाव आहे. या गावात श्री दत्त हायस्कूल आहे. या हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय शासकीय आंतरशालेय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा मुला, मुलींच्या या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड देखील करण्यात आल्याची माहिती क्रीडा समन्वयक के.यु. पाटील यांनी दिली आहे.