लातूर -भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर यंदा सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य देत, रुग्णांना फळे दिली, अन्नदान, गोशाळेसाठी चारा , विविध देवस्थानांमध्ये अभिषेक व महाआरती आदी उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक भव्यतेची जोड मिळाली.