शेतकरी चळवळीच्या नेतृत्वात उद्या दिनांक १२ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी सकाळी ठीक ११.०० वा.संविधान चौक,यवतमाळ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रा. पंढरी पाठे यांनी केले आहे.