राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मोठी मागणी राष्ट्र