मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी शुक्रवार 29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास सुरू केले आहे. मुंबई येथे राज्यभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने येत आहेत. पाथरी विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर यांनी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या त्यागमय व अखंड लढ्याची ताकद जवळून अनुभवली. हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता नसून न्याय, हक्क व स्वाभिमानाचा आहे.