लातूर -लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) तिसऱ्या दिवशीही जोरकसपणे सुरूच राहिली. बुधवारी प्रारंभ झालेल्या या कारवाईत सकाळी नऊपासूनच मनपाचे बुलडोजर शहरातील विविध ठिकाणी धडकले. चारही झोनमधील कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले.विशेष म्हणजे, आज मनपा आयुक्त मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसूळे यांनी प्रत्यक्ष सम्राट चौक परिसरात रस्त्यावर उतरून मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी अतिक्रमण हटाव पाहणी करताना अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.