पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी घराच्या कानाकोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या पळसाच्या झाडाच्या फांद्या या पहाटेच घरामधून काढून गावाबाहेर जाण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे .तेव्हा मार्बत नावांचा पुतळा युवकांनी तयार केला. मोहम्मद पुरा येथून नवरंग चौक, शिवाजी वार्ड होत मिरवणूक काढण्यात आली .गावातील रोगराई बेरोजगारी महागाई व इतर संकटाचा नाश होवो, शहरात देशात शांतता राहो या उद्देशाने मार्बत काढण्यात आली .हजारो नागरिकांनी सहभाग घेतला .गावाबाहेर नदीकाठी मार्बतीचे दहन करण्यात आले .