गुडघ्याच्या व्याधीने त्रस्त असलेले राजुरा शहरातील सोनियानगर भागात राहणारे ताज मोहम्मद अब्दुल गफ्फार शेख यांनी काल आ. देवराव भोंगळे यांच्या कार्यालयास भेट देऊन दिव्यांग सायकल (Disabled bicycle) उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत, कार्यालयाने कळविताच त्यांना आज दि 1 ऑगस्टला 11.30 वाजता सकाळी आ देवराव भोंगळे यांच्या हस्ते सायकल उपलब्ध करून सुपूर्द केली.