“रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला उजाळा देत माटोरा गावातील हनुमान मंदिर परिसरात दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवार सकाळी ८ ते ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन आम्ही समाजसाथी फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच बालमित्र गणेश मंडळ माटोरा आणि समस्त माटोरा ग्रामवाशी यांच्या सहकार्याने करण्यात आले. शिबिरासाठी विशेषतः ब्लड बँक टीम उपस्थित होती. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यांचा फळ, चहा, बिस्कीट आणि गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला.