भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी क्रिकेट सामना होणार आहे. दरम्यान, हा क्रिकेट सामना महाराष्ट्रमध्ये कोणत्याही हॉटेलमधील स्क्रीनवर दाखवण्यात येऊ नये. दरम्यान, हा सामना स्क्रीनवर दाखवण्यात आल्यास स्क्रीन बॅटने फोडण्यात येतील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे. आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी रात्री नऊ वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी इशारा दिला आहे.