औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर वगरवाडी जवळ दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली तर दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक २९ शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान घडली आहे. स्वप्नाली खामकर वय 31 वर्ष असे गंभीर जखमी झाल्याने महिलेचे नाव आहे तर तेजस खामकर, साक्षी खामकर हे किरकोळ जखमी झाले ते दुचाकी क्रमांक एमएच २६ एजी ६२११ ने छत्रपती संभाजी नगर येथून वसमत कडे जात असताना वगरवाडी जवळ दुचाकी घसरून अपघात घडला.