गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीने गंभीर रूप धारण केले असताना, शुक्रवारचा दिवस जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला.राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ३४ मिनिटांनी अखेर बंद झाले आहेत. तब्बल आठ दिवस सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबल्याने भोगावती नदीच्या पातळीत घट झाली आहे.सध्या राधानगरी येथील विद्युत केंद्रातून केवळ १५०० क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडले जात आहे.