उन्हाळ्यात मित्राच्या लग्नात झालेल्या वादातुन एका युवकावर रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वा चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना दर्यापूर अंजनगाव मार्गावरील एका हॉटेल जवळ घडली.रजत अनिलराव जाधव (वय ३०) रा.लासूर असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून अर्पण लोखंडे (वय २३)रा.गांधी नगर, आकाश निकम (वय २६) रा. ६४ जीन प्लॉट,या दोघांना रविवार रोजी अटक केल्याची माहिती आज दुपारी २ वाजता पोलीस विभागाकडून मिळाली