सातपूर भागात व्हीक्टर पॉईंट जवळ, हॉटेल मधुशाला येथे विना परवानगी मद्यपान करून देणाऱ्या हॉटेल मालकासह तिघांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हिक्टर पॉईंट जवळ,हॉटेल मधुशाला येथे विनापरवानगी मद्यसाठा बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांना मद्यपान करून देण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे.अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर हॉटेलवर छापा टाकून हॉटेल मालक गणेश दिलीप जगताप, मयूर दिवाकर शिरसाट अनिकेत सुनील पवार व निलेश प्रकाश पवार यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.