भंडारा तालुक्यातील कोका येथे स्मशानभूमी परिसरात भालेराव बहुउद्देशीय संस्था भंडाराच्या वतीने दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन संजय ईळपाते ग्रा.पं.सदस्य होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अरुण चौधरी पोलिस पाटील, निलकंठ गजबे, ईश्वर चौधरी भालेराव बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष शाम भालेराव, आकाश मेश्राम उपस्थित होते. संजय ईळपाते व अरुण चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.