कल्याणच्या नेवाळी परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अफताब हा संशयित दहशतवादी गेल्या सहा महिन्यांपासून नेवाळी परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. त्यामुळे आता पोलिसांनी देखील नागरिकांना घर भाड्याने देताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घर भाड्याने देताना त्याची सर्व कागदपत्रे पाहणे आणि ती पोलिसांकडे सादर करावेत अन्यथा घर भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई होईल असे आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी केले आहे.