न्यू गणेश कॉलनी, रवी नगर (महाराणा पुतळा जवळ) येथील विश्वजीत देशमुख यांच्या घरामध्ये आज ३ सप्टेंबर बुधवार सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आग लागल्याची माहिती अमरावती महानगरपालिका अग्निशमन विभागाला प्राप्त झाली.माहिती मिळताच विभागाचे अग्निशमन वाहन अवघ्या ८ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घरामध्ये दोन वयोवृद्ध व्यक्ती अडकलेले असताना स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत दोन्ही वयोवृद्ध व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढल