महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले "महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४" हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्क बाधित होण्याची भीती आहे.त्यामूळे सदर विधेयक रद्द करण्याचा मागणी करीता आज दि.१० सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी १२ ते ५ वाजेदरम्यान इंदिरा गांधी चौक गढचिरोली येथे सर्व पक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.