५३ वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या आश्वासन देऊन कवडीमोल किमतीने चंपक मैदान जवळील जमीन अल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतली होती. त्या जमिनीवर आज पर्यंत साधा एक प्रकल्प सरकार उभारू शकले नाही. आता ती जमीन रत्नागिरी नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्याचा घाट रचला गेला आहे. त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही. असा इशारा रत्नागिरी अल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघाने देत आज रत्नागिरी नगर परिषदेवर धडक दिली.