औसा -औसा तालुक्यातील मौजे भादा गावाजवळील शिंदेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शिकवणीच्या नावाखाली घरात कोणी नसल्याचे पाहून एका ६० वर्षीय वयोवृद्धाने सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.