कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली पुलावरून पती समोरच अनिता हजारे या महिलेने शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे.ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर अंतर्गत वजीर रेस्क्यू फोर्स आणि एसआरएफ कोर्स सांगली यांचे पथक तात्काळ सक्रिय झाले.सांगली नगरपालिकेच्या बोटीच्या साहाय्याने शोध सुरू केला.