सावखेडासिम या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ हुसेन तडवी हा वीज चोरी करत होता. त्याच्याकडे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते. व त्याने टाकलेल्या आकड्याची वायर त्यांनी काढली. तेव्हा याचा राग येऊन तडवी याने विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद घातला शिवीगाळ केली धक्काबुक्की केली शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि वाहनावर दगड फेकून वाहन फोडले. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.