स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पथक दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना भंडारा जिल्ह्यातील माता वार्ड सिहोरा येथील आरोपी ट्रॅक्टर चालक नरेश चौधरी वय 34 वर्षे याने बावनथडी नदीपात्र वार पिंडकेपार येथे त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नसताना शासन अधिकार क्षेत्रातील रेती उत्खनन करून आपल्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये भरून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक आयशर कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास...