बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच असून जलंब शिवार भारसी जवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना ५ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी जलंब पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विनायक नगर वाडी येथील नंदकिशोर मुरलीधर इंगळे वय 46 वर्ष यानी त्यांची दुचाकी क्रमांक MH 28 AT 8172 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली.या प्रकरणी जलंब पोलिसांनी तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३०३(२) बीएनएस २०२३ नुसार गुन्हा दाखल.