गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावेत, यासाठी दिग्रस पोलिस स्टेशनतर्फे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिग्रस तालुक्यातील कलगांव येथे रूट मार्च काढण्यात आला. हे रूट मार्च दिग्रस पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला असून या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, एस.आर.पी. पथक, आर.सी.पी. पथक, होमगार्ड सहभागी झाले होते. यावेळी उपसरपंच अलीमोदीन, तंटामुक्त समिती अध्यक्ष कारी निजामुद्दीन व पोलीस पाटील उपस्थित होते.