शनिवारी द्वारका उत्सव पार पडला तालुक्यातील उमरा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला सजवलेल्या बैलबंडीतील मखरातून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. ही बैलबंडी माणसं स्वतःच्या खांद्यावर घेऊन ओढतात त्यामुळे वर्षभर बैल माणसांना घेऊन जातो मात्र या दिवशी बैलाला माणसं बंडीतुन ओढतात बैला प्रतिची कृतज्ञता व्यक्त करतात यासोबतच मुंडगाव येथे देखिल उत्साहात द्वारका उत्सव पार पडला सजवलेल्या बैलांची यावेळी आकर्षक मिरवणूक काढण्यात आली.