सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे नांदेडमध्येही निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढल्याचा आरोप आंदोलकानी केला. यावेळी आंदोलकानी मुख्यमंत्री आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली या जी आर मुळे ओबीसी च्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली.