तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) सायंकाळी 5.30 वाजल्यापासून यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.