पैंगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे शहरात ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमीत्याने मदिना मज्जीद मधुन भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरणुक भंगाराम वार्ड, भोजवार्ड, बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून परत मुख्य रस्त्याने परत आल्यानंतर तिची सांगता करण्यात आली.मिरवणुकीत शहरातील सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.