आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुका पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलिसांनी आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे. या रूट मार्चमध्ये ३ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच १ क्यूआरटी पथक सहभागी झाले होते. तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये तुंगत, सुस्ते, देगाव, खर्डी आणि कासेगाव यांचा समावेश आहे.