मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबई ते दाखल झाले आहेत.मात्र त्यांच्या उपोषणाला राज्य सरकारच्या आडमुठे धोरणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मुंबईतील अनेक खाऊ गल्ली, दुकाने, हॉटेल,पाणी, शौचालय बंद करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने आंदोलकांची तातडीने सोय करावी अन्यथ भविष्यात मुंबईला जाणारा दूध,भाजीपाला रोखू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विक्रम पाटील यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दिला.