गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची २ सप्टेंबर रोजी निवड झाली.विधिमंडळातून काही सदस्यांची विद्यापीठावर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली जाते. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. नरोटे यांची निवड झाल्याचे पत्र विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव जी.डी. देबडवार यांनी काढले.