Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
आज शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी उस्मानपुरा पोलिसांनी माहिती दिली की, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महिला फिर्यादी वसंती पी राघवेंद्र शनाय यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 21 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता दुचाकी वरती आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने चोरी करून नेले आहे, या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मुळीक पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.