गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या दोन संशयित आरोपींना वरणगाव येथील फुलगाव फाट्याजवळ गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतूस, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.