पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश जारी केले असताना, खडक पोलिसांनी उघड्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीवर धाड टाकत थरार माजवला. शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरातील एका उपाहारगृहाच्या मागील खोलीत दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने छापा टाकत वैभव डोंगरे आणि गुडुकुमार या दोघांना जेरबंद केले.