मनीष सोनोने वय वर्ष 20 राहणार खेड यांनी मोर्शी पोलिसात अजय भोकरे व एका 23 वर्षीय महिलेविरोधात तक्रार दिली आहे. मनीष व अजय हे नात्याने आते भाऊ मामेभाऊ असून मनीष अजयच्या घरी का आला म्हणून त्याला 23 वर्षीय महिलेने पकडून ठेवले व अजय याने लाकडी पुरवणीच्या काठीने दोन्ही बाजूच्या पोटावर तसेच गुप्तांगाच्या बाजूला व पाठीवर पुरवणीच्या टोचण्या मारून जखमी केले अशी तक्रार पोलिसात दिली आहे. तेव्हा दोघाजणाविरोधात मोर्शी पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.