भंडारा तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा कवडसी येथे दि. 23 ऑगस्ट रोजी स. 11 वाजता दरम्यान शालेय विदयार्थ्यांकरिता तान्हा पोळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती प्रेमभाऊ वनवे सदस्य, प्रमुख अतिथी पंचायत समिती भंडाराचे उपसभापती नागेश भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मेश्राम, उपसरपंच विष्णू इंगोले, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बाभरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भारत जाखमाते, विशाल जाखमाते, स्वाती बाभरे व अन्य हजर होते.